सक्तीची भक्ती
दिवाळीच्या सुमारास ओळखीच्यांकडे जाण्याचा योग आला ज्यांच्याकडे गेलो होतो त्यांचे घर प्रशस्त तर होतेच पण मध्यवर्ती भागात असूनही तिथे शांतता होती. जवळपास सगळेच उच्चमध्यमवर्गीय लोकच राहत होते.माझे काम तसे लगेच झाले पण त्यांनी दिलेला कपभर चहा (सदर घटना पुणे येथीलच आहे)अजून संपला नसल्याने इतर गप्पागोष्टी करत बसलो.त्यांच्या सोसायटीतुन एक रस्ता जाणार होता जो सर्व प्रमुख रस्त्यांना जोडला जाणार होता. त्यामुळे रहदारीच्या समस्या सोडवण्यास मदत होणार होती पण सोसायटीमध्ल्या लोकांनी प्रखर विरोध केल्याने त्याचे काम रेंगाळले.एवढी प्राथमिक माहिती माझ्याकडे होती पण अजून जाणून घ्यायची उत्सुकता असल्याने मी त्यांना विचारले कि त्या रस्त्याचे पुढे काय झाले? त्यावर सदर व्यक्ती मला म्हणाल्या कि हा रस्ता झाला असता तर आमच्या खासगी आयुष्यावरच गदा तर आली असतीच पण आम्हाला रस्ता पार करणेदेखील जिकीरीचे झाले असते त्यामुळे आम्ही विरोध केला आणि एका रात्रीत तिथे लहान रामाचे मंदिर बांधले त्यामुळे त्या रस्त्याचा विचारच मावळला. रामाचे मंदिर बांधल्याचे त्या व्यक्ती इतक्या अभिमानाने आणि गर्वाने सांगत होत्या कि जणू काही अयोध्येमधल्या वादग्रस्त जागेवरच राममंदिर बांधले आहे.हे सगळे एका रात्रीमधे कसे काय शक्य झाले हे विचारले असता त्यांनी सांगितले, आमच्या सोसायटीमध्ये बिल्डर,कंत्राटदार,वकील,पालिकेतील अधिकारी असे लोक राहतात त्यांनीच पु्ढाकार घेऊनच हे मंदिर बांधले गेले. रामालाही किती अप्रूप वाटले असेल या भक्तीचे आणि team work चे तर हे एक उत्तम उदाहरण ठरु शकेन. केवल विरोधाला विरोध किती घातक आहे. जिथे सुशिक्षित समाजच काही विचार न करता लहानसहान विकासकामांना खो घालत असेल तिथे मोठमोठया विकासकामांबद्दल न बोललेच बरे.
शीर्षक समर्पक आहे. शेवटी पुणे काय अन अयोध्या काय सोयीनुसार रामाचा उपयोग केला जातोय. तरी नशीब शिवरायांचा पुतळा बसविला नाही तो. नाहीतर दरवर्षी दोनदा जयंत्या साजऱ्या झाल्या असत्या. चांगल्या प्रकरणाला वाचा फोडलीस. भविष्यात देखील असंच काहीसं रामायण वाचायला मिळेल या अपेक्षेसह तुला शुभेच्छा. जय श्रीराम...!!!
ReplyDeleteधन्यवाद प्रमोद सर
ReplyDeletenice title and a very nice way to make difficult topics easy for common people through an incident...
ReplyDelete