Wednesday, December 1, 2010

Political Pressure group: राजकीय दबावगट

Political Pressure group: राजकीय दबावगट
दबावगट ही आधुनिक राजकारणातील एक अत्यंत प्रभावी आणि महत्वपूर्ण शक्ती गणली जाते. आल्फ़्रेड-डी-गाझा यांच्या मते संपूर्ण राजकारण हे हितसंबधी गटांचे राजकारण झाले असून ते शासन व्यवस्थेवर प्रभाव पाडून आपल्या मागण्या मान्य करुन घेतात. सार्वजनिक जीवनावर परिणाम घडवून आणणाऱ्या कोणत्याही खासगी किंवा अराजकीय गट म्हणजेच दबावगट.फ्रान्सिस केसल्स यांनी दबावगटाच्या विविध व्याख्या केल्या आहेत. राजकीय दबावगट हे आर्थिक, धार्मिक, व्यावसायिक, भाषिक व वांशिक अशा वेगवेगळे गट पडलेले दिसतात. विशेषत: शासनसंस्थेवर या संघटनांचा प्रभाव जाणवतो. कामगार संघटना, अल्पसंख्य धार्मिक गट, उदयोजक वर्ग अशा संघटना आपल्या हितासाठी अनेक मागण्या करतात. त्यासाठी सरकारने विशिष्ट धोरणाचा पुरस्कार करावा म्हणुन जनमत जागृत करतात.याच गटांचा सरकारवर प्रभाव असण्याची शक्यता जास्त असते.
उदा. हरियाण्यातील राजकारणावर जाटांचा तर महाराष्ट्रात साखर कारखान्यांचा प्रभाव जाणवतो.
सरकारने एखादा कायदा करावा किंवा करु नये तसेच एखादा निर्णय घ्यावा किंवा घेऊ नये म्हणुन हितसंबधी गट सरकारवर दबाव आणतात भाषिक प्रांतरचनेसाठी हितसंबधी गटांनी सरकारवर दबाव आणला तेव्हाच राज्यपुनर्रचना मंडळाची नेमणुक झाली. तसेच हुंडाप्रतिबंधक कायदा करावा व महिलांवरील अत्याचार थांबवावेत म्हणुन महिला संघटनांनी दबाव आणला.दबावगटांना कोणत्याही राजकीय पक्षाशी बांधिलकी नसते प्रसंगानुरुप ते राजकीय पक्षांना पाठिंबा देतात. राजकीय दबावगट ही संकल्पना २ जी स्पेक्ट्रम घोटाळ्यावरुन अधोरेखित होते

2 comments:

  1. In US (and some other western countries) there is concept of Lobbying. There are lobby groups/advocacy groups you can hire for your cause, to get the Senators vote for the cause you want. Mostly these are legal groups and even foreign nations like India enlist their services for getting pro-India bills passed.

    ReplyDelete
  2. Thanks a lot for this information.

    ReplyDelete